top of page

sameer gandhi kala mahavidyalaya malshiras 

Shri Hanuman Shikshan Prasarak Sanstha , Malshiras Dist: Solapur (MS)

|| Vidya Eva Dhanam ||

समीर गांधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात सुरू
समीर गांधी कला महाविद्यालय माळशिरस येथे राष्ट्रीय सेवा योजना  शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सदर शिबिराचे उद्घाटन 6 जानेवारी रोजी झाले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. अॅड. मिलिंद  कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री श्रीकांत पंचवाघ संस्थेचे सदस्य संतोष कुलकर्णी, धनंजय मस्के महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास गेजगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संतोष माने, विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मा. ज्योती केसकर आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी  व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अॅड.  मिलिंद  कुलकर्णी म्हणाले मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना  महत्त्वाची आहेत. मुलांनी समाजाला समजून घेऊन समाजाभिमुख नेतृत्व निर्माण व्हावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना  शिबिर अतिशय महत्त्वाचे आहेत असे म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गेजगे म्हणाले, राष्ट्रीय सेवा  योजनेतून सुजान भारताचे भावी नागरिक तयार होणार आहेत, व ते नागरिक घडवण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करणार आहे.
    सदर शिबिरांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुली वाचवा देश वाचवा, मतदान जनजागृती स्वच्छ भारत अभियान या विषयावर गावामधे रॅली काढूनघोषणा दिल्या.
माळशिरस मधील महसवड चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, हनुमान मंदिर चौक, महात्मा फुले चौक  या परिसरात स्वच्छता केली. यावेळी स्वच्छता करीत असताना गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महाविद्यालयातील  मुलांचे कौतुक केले. 
    निरा उजवा कालवा कार्यालय परिसरात महाविद्यालयाच्या मुलांनी 2 वनराई बंधारे बांधले. सदर वनराई बंधाऱ्याचे उद्घाटन निरा उजवा उजवा कालव्याचे शाखा अभियंता लाडे S R, उपविभागीय लिपिक ठवरे एन आर . प्रा . माने एस पी. डॉ. अशोक कांबडे. प्रा. अमर वाकडे हे होते
महात्मा फुले पुतळा व अहिल्यादेवी पुतळा याठिकाणी मुलांनी वृक्षारोपण केले. याशिवाय महाविद्यालयात कंपोस्ट खतासाठी खड्डा पाडला. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा क्रिकेट, रांगोळी, शेला पागोटे, खो-खो आशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले.
सदर शिबिराचे आयोजन समीर  गांधी कला महाविद्यालय व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले आहे. सदर शिबिराचा समारोप 12 जानेवारी रोजी होणार आहे. सदर शिबिरात 69 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक संतोष माने, आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक कांबळे,  सूत्रसंचालन डॉ. ज्ञानदेव भोजने यांनी केले

bottom of page